मोदी सरकारच्या अडचणीत वाढ, संयम संपल्याने अण्णांनी घेतला आंदोलनाचा निर्णय

पारनेर ः दिल्लीत उत्तर भारतातील सरकारने आंदोलन केल्यामुळे मोदी सरकारपुढे गंभीर पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाऊनही त्यावर तोडगा निघालेला नाही. या प्रकरणाचे शुक्लकाष्ट संपत नाही तोच महाराष्ट्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार खोटारडे आहे. शेतकऱ्यांना हमीभावाबाबत दिलेले कोणतेही आश्वासन सरकारने पाळलेले नाही, त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत.

आपल्या सरकारला दिलेली अश्वासन पूर्ण करता येत नाहीत, तर खोटी अश्वासने तरी का देता, असा सवालही त्यांनी केला आहे. आपण मला लेखी दिलेल्या अश्वासनात म्हटले आहे की, आम्ही स्वामीनाथन आयोग स्वीकारला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव शेतक-यांच्या पिकांसाठी देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे, असे लेखी अश्वासन मला दिले. मात्र, ते अद्यापही आपल्या सरकारला पूर्ण करता आले नाही, असे खरमरीत पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 19) पाठविले आहे.

पत्रात हजारे यांनी पुढे म्हटले आहे की, जर सरकारला एखादी गोष्ट करता येत नाही तर सरकारने स्पष्ट म्हटले पाहिजे की हे आम्हाला करता येणार नाही. त्यामुळे मागणी करणारे नागरीक त्या बाबीची मागणी करणार नाहीत.  देश चालविणा-या सरकारने खोटी अश्वासने देणे चुकीचे आहे. त्यामुळे जनतेत सरकारविषयी चुकीचा संदेश जातो. मी माझ्या आयुष्यात कधीच खोटे बोललो नाही. त्यामुळे सरकार केवळ चालढकल करीत आहे, ही बाब त्रासदायक आहे.

हेही वाचा – आता वडिलोपार्जित संपत्ती वाटताना लागणार नाही शुल्क

आपल्या कार्यालयाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमचे सरकार शेतक-यांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील आहे. शेतक-यांच्या प्रशानंबाबत सरकार सकारात्मक आहे. देशात शेतकरी आत्महत्या का करतात, असा  प्रश्न हजारे यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे. शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव न मिळाल्यानेच आत्महत्या होतात.

तीन वर्षे लोटली तरीही…

कृषीमूल्य आयोगास स्वायत्ता द्यावी असेही म्हटले आहे. तसेच सरकारने शेतक-यांच्या मालासाठी सहा हजार कोटी रूपये खर्च करून शीतगृह उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र तीन वर्ष लोटली तरीही ते सरकारने पूर्ण केले नाही. त्या मुळे मी शेतकरी हितासाठी पुन्हा एकादा आंदोलन करीत आहे. राळेगणसिद्धीतच ३० जानेवारीपासून एल्गार पुकारला आहे. यादवबाबा मंदिरात ते उपोषण करणार आहेत.

संपादन – अशोक निंबाळकर 
         

           
            
          
           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *