राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज

पुणे – लहान मुलांच्या नियमित लसीकरणासाठी लस साठवण्याची भक्कम यंत्रणा राज्याच्या आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे कोरोनाच्या लशी साठवण्यासाठी शीतगृहे आणि त्याच्या वितरणासाठी शितपेट्यांची व्यवस्था सज्ज करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून अत्यावश्यक उपकरणांचा पुरवठा होत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
लस साठवणूक व्यवस्था –
आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर्स आणि डीप फ्रिजर्स अशी उपकरणे राज्यात आरोग्य खात्याकडे आहेत. आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर्समध्ये २ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते तर, डीप फ्रिजर्समध्ये उणे १६ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात लस ठेवता येते. सद्यःस्थितीत या दोन्ही प्रकारचे प्रत्येकी चार उपकरणे राज्यात आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात सध्या १६ वॉक इन कुलर्स आहेत. त्यात आणखी पाच नवीन कुलर्स बसविले आहेत.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात सहा वॉक इन फ्रिजर्स आहेत. हे सर्व कार्यान्वित असून, त्याचा वापर लसीच्या साठवणुकीसाठी करता येईल. केंद्र सरकारकडून प्रत्येक सहा वॉक इन कुलर आणि दोन वॉक इन फ्रिजर्स मिळाले आहेत. ते आरोग्य खात्याच्या आठ परिमंडळाच्या ठिकाणी बसविणार आहे. त्यासाठी वीजपुरवठा, बॅकअप आणि जागा निश्चित करण्यात येत आहे. कोरोना लसीची नेमक्या किती तापमानाला साठवणूक करायची, त्याचे किती डोस आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप हाती आली नाही. मात्र, त्यादृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महामार्गावरील तीव्र उतारच ठरतोय कर्दनकाळ
निडल सिरिंजेस
कोरोना प्रतिबंधक लसीच्या इंजेक्शनसाठी निडल सिरिंजेस लागणार आहे. त्याचीही संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे या सिरिंजेस साठवण्याची तयारी सुरू झाली आहे. पुण्यासह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येत आहे.
प्रशिक्षित मनुष्यबळ
कोरोना लसीचे इंजेक्शन देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यावश्यक आहे. त्यासाठी नावे निश्चित करण्यात येत आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यातून इंजेक्शन देण्यासाठी किती जणांची गरज लागणार आहे, ही माहिती मिळेल. त्यादृष्टीने लस देण्याचे प्रशिक्षण देता येईल.
पाय घसरून नात कालव्यात पडली; वाचविण्यासाठी आजोबांनीही मारली उडी, दोघांचाही बूडून मृत्यू
असे होईल लस वितरण
लस वितरणाचे प्रमुख केंद्र पुण्यात असेल. पुण्यातून कोल्हापूर, ठाणे, अकोला, लातूर, नागपूर, औरंगाबाद या आरोग्य खात्याच्या परिमंडळाला ही लस पुरविली जाईल. परिमंडळाच्या मुख्यालयाकडून ही लस जिल्ह्यात वितरित होईल. तेथून पुढे लसीकरण केंद्रापर्यंतचा लसीचा प्रवास होईल. राज्यात ५११ लसीकरण केंद्र असून, दररोज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
हिंडतो त्यांच्याबरोबर मत तुम्हालाच….!
राज्याच्या आरोग्य खात्याने चांगल्या प्रकारे लसीकरणाचा कार्यक्रम राबविला आहे. त्यासाठी पायाभूत यंत्रणा सज्ज आहे. तसेच, लस देण्यामध्येही आरोग्य खात्यातील डॉक्टर आणि परिचारिका तज्ज्ञ आहेत. खात्यातील सर्वांना कोल्डचेनची, लस देण्याच्या तंत्राची माहिती असते. त्यामुळे कोणती लस द्यायची आहे, किती तापमानात ती ठेवायची आहे, किती डोस व कसे द्यायचे आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत, याची अद्ययावत माहिती कर्मचाऱ्यांना द्यावी लागते.
– डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्यसेवा, सार्वजनिक आरोग्य खाते
Edited By – Prashant Patil