राज्यातील कोरोनाबाधिताांची संख्या 4 लाखांच्या पार; वाचा इतर आकडेवारी

मुंबई : राज्यात आज 9211 रुग्णांची नोंद झाली. त्यासोबतच राज्यातील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 4,00,651 झाली आहे. आज दिवसभरात 7,478 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, 298 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 14,463 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या एकूण 1,46,129 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.                        

एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही…

राज्यात आतापर्यंत 2,39,755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.84 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात झालेल्या मृत्यूपैकी ठाणे परिमंडळात 139, पुणे मंडळात 82, नाशकात 25, औरंगाबाद मंडळात 24, कोल्हापूरात 4, लातूर मंडळात 8, अकोला मंडळात 10 ,नागपूरात 5 आणि इतर राज्यातील एका मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.61 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 20,16, 234 नमुन्यांपैकी 4,00,651 (19.87 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,88,623 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 40,777 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

————————————

Edited by Tushar Sonawane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *