राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा!

पुणे : कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. 5) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि तळकोकणात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांताक्रुझ येथे दिवसभरात 111 मिलीमीटर, मुंबईमध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

– युवकांसाठी महत्त्वाची बातमी; आता पुणे झेडपीने सुरू केली ‘कमवा व शिका’ योजना!

पुढील चोवीस तासांमध्ये (ता. 5) कोकणातील पावसाची रिपरिप सुरच रहाणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात धुवाधार पाऊस पडेल, असा इशाराही खात्याने दिला. 

उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी लगत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. 

– यंदा इंजिनीअरिंगला प्रवेश वाढणार; नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली!

महाबळेश्वरमध्ये 82 मिलीमीटर पाऊस 
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्वर येथे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पण, सातारा, पुणे, नाशिक येथे पावसाच्या तुरळक सरी पडल्या. पुढील चोवीस तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

– नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन होणार कमी; ‘सीआयएससीई’ने घेतलाय मोठा निर्णय!

मध्य महाराष्ट्राने सरासरी ओलांडली
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 1 जून ते 4 जुलैपर्यंतच्या पावसाची सरासरी ओलांडली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. मध्य महाराष्ट्रात या दरम्यान 189.1 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा तो 250.4 मिलीमीटर (सरासरीच्या तुलनेत 32 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 32 टक्के जास्त पाऊस पडला. तेथे सरासरी 159.8 मिलीमीटर पाऊस पडतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वर्षी मराठवाड्यात 245.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोकण आणि विदर्भात पावसाने सरासरी गाठली. कोकणात सरासरीच्या चार तर, विदर्भात सरासरीपेक्षा चार टक्के कमी पाऊस पडला, असेही हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *