राज्यात आज 1802 रुग्ण कोरोनामुक्त, तर मृतांचा आकडा पाच हजार पार

मुंबई : राज्यात आज 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 2701 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 13 हजार 445 इतका झाला आहे. पैकी सध्या 50 हजार 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर राज्यात 81 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून याशिवाय 1328 मृत्यूची आज नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा पाच हजार पार
गेला आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 81 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. याशिवाय आज मुंबईतील 862 आणि उर्वरीत राज्यातील 466 अशा एकूण 1328 जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे.

सध्या राज्यात 5 लाख 86 हजार 686 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 27 हजार 242 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1,13,445

मृत्यू – 5537

मुंबई महानगरपालिका- 60, 228 (मृत्यू 3167)

ठाणे-2002 (मृत्यू 41)

ठाणे महानगरपालिका- 6330 (मृत्यू 213)

नवी मुंबई मनपा- 4892 (मृत्यू 151)

कल्याण डोंबिवली- 2913(मृत्यू 77)

उल्हासनगर मनपा – 815 (मृत्यू 37)

भिवंडी, निजामपूर – 689 (मृत्यू 24)

मिरा-भाईंदर- 1687 (मृत्यू 98)

पालघर- 455 (मृत्यू 16 )

वसई- विरार- 2138 (मृत्यू 66)

रायगड- 924 (मृत्यू 34)

पनवेल- 1048 (मृत्यू 52)

नाशिक – 365 (मृत्यू 20)

नाशिक मनपा- 829 (मृत्यू 37)

मालेगाव मनपा – 907 (मृत्यू 76)

अहमदनगर- 187(मृत्यू 11)

अहमदनगर मनपा – 61 (मृत्यू 1)

धुळे – 194 (मृत्यू 26)

धुळे मनपा – 254 (मृत्यू 25)

जळगाव- 1476 (मृत्यू 142)

जळगाव मनपा- 405 (मृत्यू 26)

नंदुरबार – 72(मृत्यू 4)

पुणे- 917 (मृत्यू 30)

पुणे मनपा- 10,876 (मृत्यू 527)

पिंपरी-चिंचवड मनपा- 1035 (मृत्यू 31)

सातारा- 760 (मृत्यू 34)

सोलापूर- 154 (मृत्यू 53)

सोलापूर मनपा- 1801(मृत्यू 131)

कोल्हापूर- 633 (मृत्यू 8)

कोल्हापूर मनपा- 100

सांगली- 241 (मृत्यू 10)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 14 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 153(मृत्यू 3)

रत्नागिरी- 445 (मृत्यू 18)

औरंगाबाद – 208 (मृत्यू 32)

औरंगाबाद मनपा – 2649 (मृत्यू 136)

जालना- 295 (मृत्यू 12)

हिंगोली- 242(मृत्यू 1)

परभणी- 55(मृत्यू 4)

परभणी मनपा-27

लातूर -138 (मृत्यू 8)

लातूर मनपा- 50(मृत्यू 3)

उस्मानाबाद-151(मृत्यू 8)

बीड – 77(मृत्यू 2)

नांदेड – 43 (मृत्यू 2)

नांदेड मनपा – 198 (मृत्यू 10)

अकोला – 99 (मृत्यू 16)

अकोला मनपा- 951 (मृत्यू 40)

अमरावती- 32 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 333(मृत्यू 25)

यवतमाळ- 190 (मृत्यू 4)

बुलढाणा – 138 (मृत्यू 5)

वाशिम – 53 (मृत्यू 3)

नागपूर- 99

नागपूर मनपा – 1011 (मृत्यू 12)

वर्धा – 14 (मृत्यू 1)

भंडारा – 51

चंद्रपूर -31

चंद्रपूर मनपा – 20

गोंदिया – 85

गडचिरोली- 49 (मृत्यू 1)

इतर राज्ये/ देश- 93 (मृत्यू 20)

Leave a Reply

Your email address will not be published.