राज्यात आतापर्यंत तब्बल एवढ्या डॉक्‍टरांना कोरोनाची लागण; तर १७ जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनायोद्धेही कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. २१ ऑगस्टपर्यंत राज्यातील एक हजार ९५३ डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाली; तर १७ बाधित डॉक्‍टरांचा मृत्यू झाला. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात ३५ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रे आहेत. कोरोना झालेले डॉक्‍टर सरकारी, पालिका आणि खासगी या सर्वच क्षेत्रांतील असून मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकमधील आहेत. भारतीय वैद्यकीय संघटने (आयएमए)च्या आकडेवारीनुसार देशभरात त्यांच्या सतराशे शाखा आहेत. या शाखांतील मिळून २६४ ‘आयएमए’ डॉक्‍टरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील १७ डॉक्‍टरांचा समावेश आहे.

धक्कादायक! खासगी केंद्रातून रेशनकार्ड मिळाल्याने राज्यात खळबळ

‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले की, निवासी डॉक्‍टर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. शिवाय मृत्यूदरही अधिक आहे. आठ टक्के डॉक्‍टरांचा मृत्यूदर आहे. सर्व डॉक्‍टरांनी संरक्षणासाठी एन -९५ मास्क, फेस शिल्डचा वापर केला पाहिजे. 

– बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; ‘मी माफी मागितली तर…’​

कोरोनाबाधित डॉक्टर
१९५३ – राज्यातील संख्या 
८९० – स्वतंत्र व्यवसाय करणारे डॉक्टर
७६७ – निवासी डॉक्‍टर 
२९६ – हाऊस सर्जन 

डॉक्‍टरांना कोरोनाची लागण होऊ नये आणि त्यातून त्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सरकारकडून आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. 
– डॉ. प्रदीप आवटे, सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.