राज्यात ‘आयटीआय’साठी आतापर्यंत केवळ ३१ टक्के प्रवेश निश्चित

पुणे – राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी राज्यात दुपटीने अर्जनोंदणी झाली होती. पण प्रत्यक्ष आयटीआय प्रवेशासाठी पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ३१ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटीआयच्या पहिल्या फेरीत ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या होत्या. मात्र त्यातील फक्त २७ हजार ३२२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केला आहे.

राज्यातील 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पहिल्या फेरीतील प्रवेशाचे हे एकूण प्रमाण ३१.०३ टक्के आहे. यातील शासकीय आयटीआयमध्ये २९.४३ टक्के तर खाजगी ३८.४६ टक्के प्रवेश झाले आहेत. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा फटका अकरावी आणि इतर प्रवेश प्रक्रियांप्रमाणे आयटीआय प्रवेशालाही बसला आहे. १४ सप्टेंबर रोजी पहिली फेरी संपली. त्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिली आहे.  यादरम्यान विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरता येणार आहे; तसेच अर्जात बदल करण्याची मुभा देखील असणार आहे.  यावर्षी १ लाख ४५ हजार ५३२ जागा उपलब्ध असून त्यासाठी राज्यभरात यंदा ३ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.