राज्यात पोलिस विभागच लाचखोरीत अव्वल, 596 सापळ्यात 814 अधिकाऱ्यांसह कर्मचारी जाळ्यात

यवतमाळ : ‘लाच देणे’ कायद्याने गुन्हा आहे. शासकीय गलेलठ्ठ पगारा व्यतिरिक्त चिरीमिरी घेत खिसे गरम करण्याचे प्रकार शासकीय कार्यालयात सर्रास चालतात. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्षभरातील 596 सापळ्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. लाचखोरीत पोलिस विभाग अव्वल आहे, तर महसूल, भूमिअभिलेख द्वितीय क्रमांकार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

हेही वाचा – चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही…

शासकीय कार्यालयात चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याचा अनुभव अनेकांचा आहे. कामासाठी नागरिकांना पैशाची मागणी केली जाते. ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ ही मराठी म्हण चांगलीच परिचित झाली आहे. लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी शासनस्तरावरून जनजागृती करण्यात येते. शासकीय कार्यालयात फलक लावण्यात येते. तरीदेखील शासनाकडून वेतन मिळत असताना अनेकांचा डोळा ‘वरकमाई’वर असतो. त्यातून गरजूंना पैशासाठी नाहक त्रास दिला जातो. होणारे काम महिनोमहिने केवळ पैशासाठी अडवून ठेवले जाते. या त्रासामुळे कंटाळलेले नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करतात. पंचासमक्ष खातरजमा झाल्यावर छापा टाकला जातो. एक जानेवारी ते 16 डिसेंबर 2020पर्यंत एसीबीने राज्यात 596 सापळे रचले. त्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. वर्ग एकचे 41 अधिकारी, दोनचे 69, वर्ग तीन 490, वर्ग चार 21, इतर लोकसेवक 50 आणि खासगी 143 व्यक्तींचा लाचखोरीत सहभाग आढळून आला आहे. सापळा कारवाईत एक कोटी 39 लाख 32 हार 940 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – हुंडाबळी! सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यवरून ढकलले;…

विभागनिहाय संशयित –
महसूल, भूमिअभिलेख, नोंदणी विभागाचे 203 संशयित, पोलिस 209, विज वितरण कंपनी 36, महानगरपालिका 32, नगरपरिषद 22, जिल्हा परिषद 18, पं.स. 75, वनविभाग 39, पदुम विभाग चार, अन्न व नागरी एक, जलसंपदा सहा, सार्वजनिक आरोग्य विभाग 19, राज्य उत्पादन शुल्क सहा, प्रादेशिक परिवहन विभाग तीन, पाणीपुरवठा चार, बांधकाम विभागदहा, विक्रीकर विभागसहा, विधी व न्यायविभाग चार, समाजकल्याण सहा, नगररचना एक, वित्त विभाग सहा, सहकार व पणन 29, शिक्षण विभाग 24, अन्न व औषधी तीन, कृषी विभाग 16, राज्य परिवहन तीन, इतर विभाग 11, महिला व बालविकास चार, म्हाडा तीन, प्रदुषण नियंत्रण मंडळ दोन, वजन मापे दोन, उच्च व तंत्रशिक्षण दोन, कौशल्य, सामाजिक न्याव प्रत्येकी एक कारागृह विभाग तीन, असे एकूण 814 जण एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत.

हेही वाचा –येणाऱ्या बाळासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी गेला बाप; मात्र, बाळ येण्यापूर्वी…

परिक्षेत्रनिहाय सापळे –

परिक्षेत्र गुन्हे आरोपी
मुंबई 21 34
ठाणे 43 64
पुणे 134 188
नाशिक 94 116
अमरावती 78 108
औरंगाबाद 88 119
नांदेड- 67 92

Leave a Reply

Your email address will not be published.