राज्यात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया उद्यापासून

पुणे – राज्यातील सहकारी संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. इतर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक कामकाजासाठी घेण्यात यावी, असे निर्देश निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिले.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. पाटील यांनी राज्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबाबतचा आढावा घेतला. पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन), सर्व प्रादेशिक सहसंचालक (साखर), सर्व प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) आणि सर्व विभागीय उपनिबंधक (दुग्ध) तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी उपस्थित होते. या वेळी कर्मचाऱ्यांसाठी प्राधिकरणाने तयार केलेली हस्तपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. निवडणूक खर्चात काटकसर करावी. सहकारी संस्थांच्या निवडणूका नियमानुसार, पारदर्शकपणे पार पडतील, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.