राज्यात ३१ हजार टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य, तरुणांचे भवितव्य टांगणीला

नंदोरी (जि, वर्धा) : सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ३१ हजार उमेदवारांची प्रमाणपत्रे २०२१मध्ये मुदतबाह्य होणार आहेत. या प्रमाणपत्राची वैधता सात वर्षे असते. प्रमाणपत्रावर तसे स्पष्ट नमूद करण्यात आले असल्याने या प्रमाणपत्रधारकांची पंचाईत होणार आहे.
हेही वाचा – एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण
गत सात वर्षांपासून विविध विषयांतील पदवीधर युवक शिक्षण शास्त्रातील पदवी, पदविका व टीईटी उत्तीर्ण परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरी मिळण्याचे आशेवर वणवण भटकत आहेत. मात्र, अद्यापही नोकरी मिळाली नाहीच. दिवसेंदिवस अनुदानित शाळांतील घटत्या पटसंख्येमुळे संचमान्यतेत शिक्षक संख्या कमी होत आहे. शिक्षक अतिरिक्त होत आहे. अद्याप अतिरिक्त शिक्षकांचा तिढाही कायम आहे. अशातच या ३१ हजार शिक्षकांची टीईटी परीक्षा प्रमाणपत्रे मुदतबाह्य झाल्यामुळे त्यांच्या समोर भवितव्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
हेही वाचा – एकाचवेळी दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर, बाळाला दूध पाजून येताच क्षणार्धातच कळली मृत्यूची बातमी
शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया गत दहा वर्षांत विविध कारणांनी रखडली आहे. मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून २०१३ मध्ये ३१ हजार ७२ विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांना अद्याप नोकऱ्या नाहीत. बेरोजगार असणाऱ्या या शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र अवैध होणार असून २०२१ पासून पुढील शिक्षक भरतीसाठी हे उमेदवार अपात्र ठरणार आहेत. अशा उमेदवारांना आपले प्रमाणपत्र पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा टीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ज्यात दहा लाखांहून अधिक बीएड, डीएडधारक बेरोजगार आहेत. दहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. आता कुठे शिक्षक भरती सुरू होणार तशात या ३१ हजार उमेदवारांची टीईटी प्रमाणपत्र कालबाह्य होणार असल्याने त्यांचेवर संकट ओढवले आहे.
हेही वाचा – धगधगत्या आगीत ‘एनआयसीयू’मध्ये घुसला अन् वाचविला ७ बालकांचा जीव, वाचा शूर…
कायम वैधतेचा निर्णय तत्काळ घ्यावा –
२०१३ ते २०१९ या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षक पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणारे राज्यात ८६,२९८ उमेदवार आहेत. २१३ मध्ये उत्तीर्ण झालेले ३१ हजार उमेदवार व २०१४ ते २०१९ पर्यंत उत्तीर्ण झालेले आणखी ५५ हजार उमेदवार नोकरीशिवाय घरी बसून आहेत. यापैकी अनेक जणांनी सेंट्रल टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अनेक उमेदवारांनी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयात पार्ट टाइम किंवा कंत्राटी तत्त्वावर शिक्षक पदावर रुजू होऊन तात्पुरती सोय केली आहे. मात्र, नोकरीत कायम होण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. २०२१नंतर टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शासनाकडून कायम वैधता मिळणार असल्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे.