राज्यात 3 कोटी लसीचे डोस ठेवण्याची क्षमता, सरकारच्या अहवालातून माहिती समोर

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लस अंतिम टप्प्यात असल्याने तिच्या साठवणुकीची तयार करण्यात येतेय. राज्यात सध्या तीन कोटी लस कुप्या (डोस)  साठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी सविस्तर स्थिती अहवाल दिला असून त्यात ही माहिती दिली आहे.

देशात सध्या पाच पेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधित लसींवर काम सुरू असून त्यातील सिरम इंन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक कंपनीची लस चाचणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय इंग्लंडमधील फायजर कंपनीची लस तयार झाली आहे.  त्यामुळे जानेवारी महिन्यात यातील एखादी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र लस पुरवठा आणि साठवण करण्यासाठी खास खबरदारी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार त्याची तयारी करतंय.

महाराष्ट्र सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी सविस्तर स्थिती अहवाल दिला आहे. त्यानुसार राज्यात सध्या तीन कोटी लस कुप्या साठवण्याची क्षमता असल्याचे कळवले आहे. त्यासह राज्य, प्रादेशिक, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर लस स्टोअर्स आहेत. त्याशिवाय सहा वॉक-इन कूलर आणि दोन वॉक-इन फ्रीझर देखील मिळवण्यास तयार असून यामुळे साठवण क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य मिशनचे आयुक्त एन. रामास्वामी यांनी दिली.

मुंबई, ठाणे, कल्याण विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविड लसीकरण मोहिमेचा इतर लसीकरणावर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र कोविड लसीकरण मोहिमेचा राज्यातील इतर लसीकरण कार्यक्रमांवर परिणाम होणार नाही असे ही रामास्वामी यांनी स्पष्ट केले. कोविड -19 चा प्रतिकार करण्यासाठी कोणती लस मंजूर झाली आहे आणि ते तापमान कसे संचयित करावे लागेल यावर सर्व अवलंबून असेल. सध्या आपल्याकडे दोन प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून त्यात 2 अंश सेल्सिअस आणि 8 अंश सेल्सिअस तापमानात नित्य लसीकरण लस ठेवू शकतात.  याशिवाय दोन नवीन वॉक-इन कूलर च्या मदतीने 15 अंश सेल्सियस ते 25 अंश सेल्सियस तापमानात लस ठेवण्याची क्षमता असल्याचे ही रामास्वामी यांनी सांगितले.

केंद्राकडून कोल्ड साखळी सुविधांच्या मूल्यांकनासंदर्भात महाराष्ट्र सुविधांच्या बाबतीत अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा चांगल्या सुविधा राज्यात असल्याचे राज्य नोडल अधिकारी डी. एन. पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रात लसींच्या वाहतुकीसाठी अधिक रेफ्रिजरेटर आणि इन्सुलेटर व्हॅन मिळण्याची अपेक्षा असल्याचे ही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा- भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग खोदण्याचे काम जानेवारी महिन्यापासून

शुक्रवारपर्यंत राज्याने सुमारे 1.91 लाख आरोग्यसेवा कर्मचा-यांचा डेटा कोव्हीन या सरकारी अ‍ॅपवर अग्रक्रम लसीकरणासाठी अपलोड केला आहे. एका कोंद्रावर साधारणता 100 जणांना एकावेळी लस देता येईल अशी तयारी करण्यात आली असल्याचे ही पाटील यांनी पुढे सांगितले. तर मुंबईतील 1.25 लाख आरोग्य कर्मचा-यांना 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत आठ केंद्रांवर कोविड लस दिली जाणार आहे. 

केंद्राच्या योजनेनुसार वैद्यकीय कर्मचारी प्रथम लसीकरण करतील, त्यानंतर आरोग्य कामगार, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, वाहतूक कर्मचारी अशा अग्रगण्य कामगारांना ही लस दिली जाईल असे राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

——————————–

(संपादन- पूजा विचारे)

Capacity keep 3 crore vaccine doses state according information government report

Leave a Reply

Your email address will not be published.