राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात – वडेट्टीवार

पुणे – राज्य सरकारच्या महसूलाला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी जे “कोरोनायोद्धा’ आहेत, ते वगळता इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,” अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वडेट्टीवार आज पुण्यात आले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “”कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. मदत, आरोग्यासह कोरोनासाठी लढा देत असलेले चार विभाग वगळता अन्य सर्व विभागातील खर्चांना राज्य सरकारने कात्री लावली आहे. परंतु, “कोविड-19′ साठी काम करीत असलेल्या योद्ध्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. एकावेळी आयएएस अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करू; परंतु परिचारिका आणि डॉक्टरांना मात्र त्याची झळ पोचू देणार नाही.”
केंद्राकडून मदतच नाही
कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केला जात आहे. त्याबद्दल वडेट्टीवार म्हणाले, “”केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. विरोधक विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा