राज्य सरकार अस्थिर करणे हा राज्यपालांचा डाव

कऱ्हाड : राज्य सरकार स्थिर आहे. मात्र त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपसह राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्याकडून होत आहे. कोरोनाच्या काळातील स्थितीचा भाजपकडून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र त्यातून साध्य काहीही होणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री काॅंग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

सध्या महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींविषयी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे मत जाणून घेण्यासाठी माध्यमांनी त्यांना गाठले. त्यावेळी आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधतानाच प्रथम राज्यपाल यांच्या भुमिकेबाबत शंका व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यातील स्थिती बिकट आहे. कोरोनाचे संकटाशी राज्य सामना करत आहे. मात्र याच कोरोनाच्या काळातील स्थिती सावरण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याचे सोडून भाजप त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहे. महापुर आला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराचे राजकारण करु नका, असे आवाहन केले होते. मग कोरोनाच्या या स्थितीत तुम्ही करत असलेले राजकारण वाईट आहे. राज्याला सावरण्यासाठी राजकारण करणे बंद करावे. त्यांना राज्यपालांची साथ आहे असा दावाही आमदार चव्हाण यांनी केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदाराबाबत राज्यपालांनी घेतलेली भुमिका शंकास्पद आहे. आत्ताच्याही त्या स्थितीचा ते फायदा घेत आहेत. ते चुकीचे आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले. 

आमदार चव्हाण म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार अनुभवी आहेत. त्यांना सल्ल्यासाठी कोणी बोलवले तर त्याची वेगळी चर्चा होण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल त्यांच्याशी काही महत्वाच्या मुद्दावर चर्चा केली आहे. मात्र सरकार स्थिर आहे का, अशी होणारी चर्चा निरर्थक आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात…

संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं ‘मोठं’ भाष्य…

महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा…

कॉंग्रेस नेत्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी सेनेचे मंत्री म्हणाले….

Leave a Reply

Your email address will not be published.