लासलगावचा कांदा रेल्वेने पोहोचला थेट बांगलादेशमध्ये; तब्बल ‘इतके’ लाख टन कांद्याची निर्यात

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे प्रवासी सेवा बंद आहे. केवळ निवडकच रेल्वे सुरु आहे. मात्र, देशातील रेल्वेची मालवाहतूक मात्र पूर्ण क्षमतेने सुरु आहे. अनेक विशेष पार्सल रेल्वे चालवून लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने विेशेष योगदान दिले. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने पहिल्यांदाच 22 जुलै रोजी नाशिकच्या लासलगाववरून  बांगलादेशातील दर्शना येथे कांद्याची निर्यात केली. 

लॉकडाऊनमध्येही दिलासादायक बाब; कौटुंबिक हिंसाचारात झाली मोठी घट… 

या विशेष मालवाहू रेल्वेमध्ये कांद्याने भरलेल्या 20 पार्सल व्हॅन होत्या. मध्य रेल्वेने यापूर्वीच मे महिन्यापासून ६२ मालगाड्यांद्वारे 1.56 लाख टन पेक्षा अधिक कांद्याची निर्यात बांगलादेशात केली आहे.  शेतकर्‍यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासह शेजारील राष्ट्र बांगलादेशची अत्यावश्यक गरज भागविली गेल्यामुळे रेल्वेसाठी ही एक समाधानाची बाब आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालानंतर ‘इथे’ मिळणार गुणपत्रिका…

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव आणि येवले स्थानकांमधून बांगलादेशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे दीड लाख टनांहून अधिक कांद्याची वाहतूक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कांदा निर्यातदारांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. लोडिंग दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या आदेशानुसार सोशल डिस्टंसिंगचे उपाय आणि सॅनिटायझेशनच्या  प्रथा पाळल्या जात आहेत.

यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या ‘या’ महिलेची यशोगाथा नक्की वाचा

मध्य रेल्वेने आपल्या विशेष गाड्यांमधून आणि पार्सल विशेष गाड्यांमधून सुमारे 29 हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. यात पार्सल विशेष गाड्यांमधील सुमारे 20 हजार टन आणि विशेष गाड्यांमध्ये 9 हजार टनांचा मालाचा समावेश आहे.
—-
संपादन : ऋषिराज तायडे 

Leave a Reply

Your email address will not be published.