व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दोनच प्रवेश फेऱ्या; सीईटी सेलकडून नियमावली जाहीर

पुणे : कोरोनामुळे व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी सीईटी सेलने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी दोन प्रवेश फेऱ्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली आहे. 

– …फक्त लग्न मोडले म्हणून!​

इंजिनिअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील, पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे. 

– कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​

सीईटी सेल नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रिया जुलै-ऑगस्ट ऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष देखील कोलमडले आहे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने पाऊल उचलले आहे. पुढील तीन चार दिवसात पहिली फेरी व 
प्रवेशाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

– पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

महाविद्यालय सस्तरावर प्रवेशास सवलत नाही? 
प्रवेश फेर्यां झाल्यानंतर महाविद्यालयात अनेक जागा रिक्त रहातात. त्यानंतर तेथे महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिली जाते. पण यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कोणतीही सवलत मिळत नाही. याबाबत शासनाने विचार करावा, असे  सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. श्यामकांत देशमुख यांनी सांगितले.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Leave a Reply

Your email address will not be published.