शेवटी आईचा जीव तो ! चक्क मांजराच्या पिल्लाला कुशीत घेऊन कुत्रीनं पाजलं दूध

पुणे : अनेकजण आजूबाजूला नेहमीच मांजर आणि कुत्रा पाहिलंच असेल. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष असणार आहे. बरोबर ना, तुम्ही असाच  विचार केला असेल. परंतु हे सांगण्या विशेष कारण आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्हाला माहित असेलच मांजर आणि कुत्रा हे एकमेकांचे शत्रू आहेत. पण हे शत्रुत्व बाजूला ठेवून चक्क मुक्या जीवांमध्येही माया असलेली दिसून आली आहे. त्यातीलच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कुत्री आणि मांजर यांच्यातील आई-पिल्लाचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधील मांजर आणि कुत्रीचे नातं अनेकांना भावलं आहे.
 
या व्हिडीओमध्ये एका कुत्रीनं मांजराच्या पिल्लाला दूध पाजण्यासाठी पान्हा मोकळा करून दिला आहे. ही घटना नायजेरियामधील एका गावाची आहे. हा व्हिडीओ फक्त 32 सेकंदाचा आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरु आहे.   

 

व्हिडीओमध्ये एका रस्त्याच्या कडेला एक कुत्री झोपली आहे. तिथे मांजरचं लहानसं पिल्लू तिचं दूध पित असल्याचं दिसत आहे. मांजर दूध पित आहे तरीही कुत्री शांतपणे पडून आहे. जणू त्या पिलाची ती कुत्री आईच आहे. हे दृश्य पाहणारे अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत असून, कौतुकानं हे अनोखे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडिओला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून दोन हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ४८१ पेक्षा जास्त जणांनी रिट्विट केला आहे. त्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केले आहेत.

या व्हिडिओला पाहून काहींनी कॉमेंट्स केल्या आहेत. त्यात ‘हे खूप सुंदर आहे! निसर्ग सर्व शक्तीमान आहे, त्याच्यापुढे मानवानं खूप नम्र असलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे, असं एका युझरनं म्हटलं आहे, तर एकानं ‘या दोन्ही प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी कमेंट केली आहे.

रोजच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या गोष्टींची चर्चा सुरु असतेच आणि ती तुफान व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ खूप गंमतीशीर असल्यामुळे आपल्याला हसवतात, तर काही व्हिडिओ रडवून जातात.

Leave a Reply

Your email address will not be published.