सांगली एपीएमसीत हळदीचे सौदे, राजापुरी हळदीला 21 हजारांचा दर

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या सौदयात राजापुरी हळदीला उच्चाकी 21 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मागील 10 वर्षात इतका उच्चाकी दर मिळाला नसल्याचे शेतकरी आणि हळद खरेदीदार सांगत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील मेसर्स सातारा सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात झालेल्या हळद सौद्यात सातारा जिल्ह्यातील धर्मराज देवकर या शेतकऱ्याच्या हळदीला क्विंटलला हा एकवीस हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे.