‘सीआरपीफ’च्या दहा तुकड्या दाखल – अनिल देशमुख

मुंबई – कोरोनाविरोधातील लढाईत महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय पोलिस दलाच्या दहा तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या दहा तुकड्यांच्या प्रत्येक तुकडीत १०० पोलिस आहेत. केंद्रीय पोलिस दलाच्या एकूण २० तुकड्यांची मागणी केली होती. त्यापैकी १० तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये पाच तुकड्या शीघ्र कृती दलाच्या, तीन सीआयएसएफच्या, तर दोन सीआरपीएफच्या तुकड्यांचा समावेश आहे. प्रत्येक तुकडीत १०० पोलिस आहेत, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावती अशा ठिकाणी या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. पुढील काळामध्ये रमजान ईद, पालखी आणि गणेशोत्सव आहे. या सर्व सणांमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी आणि पोलिसांना थोडी विश्रांती देण्यासाठी केंद्रीय पोलिस दलाच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. बाकीच्या तुकड्यादेखील लवकरच दाखल होतील, असेही देशमुख म्हणाले.