सीईटी घ्यायची की नाही, याबद्दल सरकारमध्येच संभ्रम; पण पंजाब तंत्रशिक्षण विभागाने घेतला हा निर्णय

पुणे – बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी होणार का, कधी होणार, याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच पंजाब तंत्रशिक्षण विभागाने मात्र बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याच पद्धतीने प्रवेश का करू नयेत, अशी चर्चा सुरू झाली आहे, तर काही खासगी विद्यापीठांनी एकत्र येत त्यांची सीईटी घेऊन प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली आहे.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कृषी पदवी प्रवेशासाठी राज्य सरकार प्रवेश परीक्षा घेते. बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्याला ५० टक्के गुण मिळाले की तो सीईटी देण्यास पात्र ठरतो. आता कोरोनामुळे सीईटी घ्यायची की नाही, याबद्दल सरकारमध्येच संभ्रम आहे.

तरुण-तरुणींनो, मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करताय? तर ‘जोकर’पासून राहा सावध

पंजाब पाठोपाठ महाराष्ट्रातही सीईटी न घेता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश करावेत, अशी मागणी होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विनाअनुदानित तंत्र शिक्षण संस्थांकडून ही मागणी होत आहे. पंजाब तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आय. के. गुजराल पंजाब तंत्र विद्यापीठ, महाराजा रणजित सिंग पंजाब तंत्र विद्यापीठ आणि पंजाब कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे बारावीच्या गुणांच्या आधारे होणार आहेत. फार्मसीचे प्रवेश परीक्षेशिवाय, तर वास्तुकला पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे बारावी आणि कलचाचणीच्या आधारे होणार आहेत.

– रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

पुण्यातील आयआयटीपीयन प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ‘‘सरकारने सीईटी न घेणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचे उल्लंघन असेल. राज्य सरकारला सीईटी घेण्याबाबत अडचण असेल, तर त्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या जेईई मेन या परीक्षेच्या आधारे महाराष्ट्रातील महाविद्यालयांची प्रवेश फेरी करावी. ज्यांनी ही परीक्षा दिली नाही, त्यांना पुढे होणाऱ्या जेईई परीक्षेला बसण्याची संधी देऊन, पुढील प्रवेश फेऱ्या कराव्यात. ही परीक्षा ऑनलाइन असल्याने सरकारचा सीईटी घेण्याचे कष्टही वाचतील.’

काय सांगता? बायकांना लागले तंबाखूचे डोहाळे; टक्केवारी धक्कादायक!

राज्याच्या सीईटीची तारीख निश्‍चित झालेली नाही. त्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. त्यांच्या स्तरावरच्‌ त्यांची प्रवेश प्रक्रिया होते.
– संदीप कदम, आयुक्त, सीईटी सेल

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.