सोलापुकरांनो कुटुंबाची घ्या काळजी ! आज 36 पॉझिटिव्ह; शहरात उरले 436 रुग्ण

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून सोलापुकरांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केल्यास निश्‍चितपणे काही दिवसांत हा विषाणू हद्दपार होईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. शहरात सुदैवाने आज एकाही रुग्णाचा बळी गेला नाही, परंतु 36 नव्या रुग्णांची भर पडली आहे. प्रत्येकांनी आपापल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्‍चितपणे या संकटावर आपण मात करु, असा विश्‍वास महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी व्यक्‍त केला आहे.

शहरातील सद्यस्थिती… 

  • एक लाख दोन हजार 555 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत 92 हजार 796 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह
  • शहरात सापडले आतापर्यंत नऊ हजार 759 कोरोना बाधित
  • एकूण रुग्णांपैकी आठ हजार 781 रुग्णांची कोरोनावर मात; आता उरले 436 रुग्ण
  • आतापर्यंत 362 पुरुषांचा आणि 180 महिलांचा कोरोनाने घेतला बळी

शहरात आज जयकुमार नगर, प्रमोद नगर, अमृता नगर (विजयपूर रोड), इंद्रधनू अपार्टमेंट (मरिआई चौक), म्हाडा बिल्डिंग (डी- मार्टजवळ, पुणे रोड), दाजी पेठ, शिवगंगा नगर (कुमठा नाका), मुलींचे वस्तीगृह (होटगी नाका), तालुका पोलिस ठाण्यामागे (गुरुनानक चौक), सिव्हिल हॉस्पिटलजवळ (गेट क्र. एक), ओमगर्जना चौक (सैफूल), कमटम वसाहत, फुरडे रेसिडेन्सी (सुंदरम नगर), सिध्देश्‍वर पेठ, अंत्रोळीकर नगर, सिरत नगर, लक्ष्मी नारायण अपार्टमेंट (जगदंबा चौक), नवोदय नगर (होटगी रोड), राजस्व नगर, नालंदा नगर, सेटलमेंट कॉलनी क्र. चार, निराळे वस्ती, रेल्वे लाईन्स, कुंभार गल्ली (लष्कर), देशमुख- पाटील वस्ती, सरवदे नगर (विडी घरकूल), बनशंकरी नगर, विडी घरकूल, नवोदय नगर (मजरेवाडी) आणि भवानी पेठेत एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, सोलापुरातील 89 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये असून 42 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 23 संशयित होम आयसोलेशनमध्ये आहेत.
 

Leave a Reply

Your email address will not be published.