सोलापुरात विडी उद्योग सुरु करण्यास सशर्त परवानगी

सोलापूर – सोलापूर शहरातील विडी उद्योग सुरु करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज काढले. 

आयुक्तांच्या आदेशानुसार विडी कामगारांना विडी पत्ता व तंबाखू त्यांच्या घरी देणे बंधनकारक आहे. विडी तयार झाल्यानंतर कामगारांच्या घरातूनच विडी घेणेही बंधनकारक राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये ही घरपोच सेवा देता येणार नाही. अन्य ठिकाणी सुविधा असलेल्या भागात विडी गोळा करणारी गाडी कुठेही थांबणार नाही व त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावयाची आहे. घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांना ग्लोव्हज, मास्क, फेस शिल्ड व प्रोटेक्टिव किट देणे कारखानदारांनावर बंधनकारक असणार आहे. 

कारखान्यात नोंदणीकृत कायम कामगाराशिवाय कोणी असणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. घरी बसून विडी काम करणाऱ्या कामगारांना मास्क द्यावे लागणार आहेत. सर्व कारखानदारांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विडी कामगारांना आजार नसल्याची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागणार आहे. तसेच वैद्यकीय सुरक्षा व सुरक्षित अंतर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असणार आहे, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Conditional permission to start vidi industry in Solapur

Leave a Reply

Your email address will not be published.