स्पर्धा परीक्षेसाठी निवडलं एक सेंटर, आलं भलतंच; उमेदवारांमध्ये गोंधळ

पुणे : महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे, पण विद्यार्थ्यांनी ज्या शहरात परीक्षा केंद्र नोंदविले होते, त्याऐवजी भलत्याच शहरात परीक्षा द्यायला जावे लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे केंद्र विदर्भ, मराठवाड्यात आले आहे. तर विदर्भातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रात टाकल्याचा प्रकार समोर आल्याने ऐन कोरोनाच्या काळात हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

– रविवार ठरला घातवार; एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

शासनाने आरोग्य विभागातील ३ हजार १५० पदांसाठी अर्ज भरून घेतले होते. ही परीक्षा २८ फेब्रुवारीला होणार असल्याने त्याचे प्रवेशपत्र महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये खासगी कंपनीने चुकीच्या पद्धतीने परीक्षा केंद्र दिल्याचे समोर आले आहे. त्यात ज्या परीक्षार्थींनी पुणे, सातारा, सांगली ही केंद्र निवडली होती, त्यांना विदर्भ, मराठवाड्यातील केंद्र देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अकोला, वाशीम, नागपूर ही केंद्र निवडली होती, त्यांना सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर हे केंद्र दिली आहेत. काहींना मराठवाड्यातील केंद्र दिले आहेत. मुळात उमेदवारांनी जे शहर निवडले होते, तेथेच केंद्र देणे अपेक्षित आहे.

– पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशा सद्य:स्थितीत दूरचा प्रवास करून परीक्षा देणे विद्यार्थी आणि कुटुंबासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यातून महापरीक्षा पोर्टलने त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.आदित्य वागरे म्हणाला ‘‘मी परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले होते, पण माझे केंद्र गडचिरोलीमध्ये आले आहे. अशाच प्रकारे हजारो विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलले आहे. दोन वर्षानंतर परीक्षा होत असताना चुकीच्या पद्धतीने परीक्षा केंद्र दिल्याने मोठे नुकसान होणार आहे.’’

सूरज हांगे म्हणाला, ‘‘माझे परीक्षा केंद्र सातारा होते, पण आता लातूरला जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोनाचे संकट वाढताना आम्हाला लांबचा प्रवास करायला लावणे धोकादायक आहे. त्यामुळे जे परीक्षा केंद्र दिले तेच मिळाले पाहिजे.

– उर्से टोल नाक्यावर घातला होता धिंगाना; गजानन मारणेच्या 17 साथीदारांना अटक​

एकाच दिवशी सर्व परीक्षा
आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती होत आहे, त्याचे स्वतंत्र अर्ज आम्ही भरले आहेत. पण या सर्व परीक्षा एकाच दिवशी व स्वतंत्र शहरात होत आहेत. यामध्ये आमचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Leave a Reply

Your email address will not be published.