स्मार्ट बुलेटिन | 6 सप्टेंबर 2020 | रविवार | ABP Majha

1. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा एका तासाचीच, 13 मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा, भीती न बाळगण्याचं कुलगुरु समितीचं विद्यार्थ्यांना आवाहन

2. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक; एका दिवसात तब्बल 20 हजार 489 रुग्णांची नोंद

3.पुण्यातील जम्बो रुग्णालयाचा स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू; 120 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, सूत्रांची माहिती

4. मनीष भंगाळेला रात्री दीड वाजता का भेटलात? एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, मुख्यमंत्रिपदाआड येऊ नये म्हणून आपल्याला बाजूला केल्याची खडसेंची खदखद

5. व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर पुण्यातला लॉकडाऊन उठवला, अजित पवारांची कबुली, पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबतही अहवाल मागवला

6. अंबरनाथ एमआयडीसीतल्या कंपनीतून गॅस गळती, लोकांना श्वास आणि खोकल्याचा त्रास, आजूबाजूच्या परिसरात पसरलं धुरकं

7. स्त्री भ्रूण हत्येप्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा, परळीजवळच्या दवाखान्यावर बीड जिल्हा आरोग्य विभागाची कारवाई

8. पॉझिटिव्ह की निगेटिव्हच्या नादात महिलेची रस्त्यावरच प्रसुती, कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील धक्कादायक प्रकार, आरोग्य व्यवस्थेचा गर्भवतीला फटका

9. पर्यटकांसाठी खुशखबर! MTDCचे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स आजपासून सुरू

10. सुशांत ड्रग्ज प्रकरणी दीपेश सावंतला अटक, शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला 4 दिवसांची कोठडी, रियाला आज एनसीबीकडून चौकशीला बोलावण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published.