5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना डिसेंबरपासून भरता येणार ऑनलाइन प्रवेश अर्ज

पुणे – मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने पावले उचलली आहेत. मुक्तपणे इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एक डिसेंबरपासून ऑनलाइन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरता येणार आहे. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिव्यांग, विशेष प्राविण्य असणाऱ्या किंवा अन्य विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही शालेय परीक्षा देता यावी यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाच्या धर्तीवर राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ साधारणतः दोन वर्षापूर्वी सुरू झाले. या मंडळाअंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकतात. चौदा वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येते. मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते. त्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांशी समकक्ष असतात.

येथे सर्व कामे विनामूल्य होतात…पोलिस ठाण्यातील पाटी चर्चेचा विषय

मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता नाव नोंदणी सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज १ ते ३१ डिसेंबर दरम्यान स्वीकारण्यात येणार असल्याचे राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुक्तपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

गुंजवणी पाईप लाईनला शेतकऱ्यांचा विरोध

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया –
– तपशील : कालावधी
– विद्यार्थ्यांचा नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन भरणे : १ ते ३१ डिसेंबर २०२० (रात्री ११.५८ वाजेपर्यंत)
– विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रामध्ये जमा करणे :  २ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१
– संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी : ८ जानेवारी २०२१

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : “http://msbos.mh-ssc.ac.in

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *