9 February In History: कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे यांची पुण्यतिथी, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या जनगणनेची तयारी; आज इतिहासात

On This Day In History : समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबा आमटे (Baba Amte) यांची आज पुण्यतिथी आहे. 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या शहरात त्यांचा जन्म झाला होता. मुरलीधर देवीदास आमटे असे त्यांचे मूळ नाव. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली. तसेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत देखील बाबा आमटे यांचा सहभाग होता. त्यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले. त्यांचा आदिवासी समाजाविषयी असणारा आदरभाव आणि उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते.  बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोग असलेल्या रुग्णांची सेवा केली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगग्रस्तांना आधार देण्याचे मोठे काम त्यांनी केले. यासाठी त्यांनी 1952 साली वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना केली. आनंदवन हे अनेक कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. बाबा आमटे यांनी आदिवासींच्या विकासासाठी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत आदिवासींना शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात. याशिवाय या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे सुरू आहेत. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करणाऱ्या बाबा आमटे यांचे 9 फेब्रुवारी 2008 ला वरोडा येथील निवासस्थानी निधन झाले. 

1951: स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना करण्यासाठी यादी तयार करण्याचे काम सुरू झाले. (census)

जनगणना हा दर दहा वर्षांनी साजरा होणारा असाच एक राष्ट्रीय सण आहे, ज्यामध्ये देशाच्या प्रत्येक भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा समावेश केला जातो. 1871 नंतर देशात दर 10 वर्षांनी जनगणना होते. या अर्थाने 1947 मधील फाळणी आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मधील जनगणना ही नववी जनगणना असली तरी स्वातंत्र्यानंतरची ती पहिलीच जनगणना होती आणि फाळणीमुळे अनेक बदल झाले. त्यामुळे भारताचा नकाशा बदलण्याबरोबरच हिंदू मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाणही बदलले. स्वतंत्र भारताच्या जनगणनेच्या इतिहासात 9 फेब्रुवारीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी जनगणनेची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले होते.

1968: चित्रपट अभिनेता राहुल रॉय यांचा वाढदिवस (Rahul Roy)

‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता राहुल रॉय याचा आज वाढदिवस आहे. राहुल रॉयची कारकीर्द रोलर-कोस्टरपेक्षा कमी नाही. राहुल रॉय त्याच्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात सुपरस्टार झाला. पण एक वेळ अशी आली की त्याला कोणीही मोठे चित्रपट ऑफर करत नव्हते. काही काळानंतर राहुलचे अनेक बॅक टू बॅक सिनेमे रिलीज झाले. ज्यामध्ये ‘फिर तेरी याद आयी’, ‘जानम’, ‘सपने साजन के’, ‘गुमराह’ आणि ‘मजदार’ सारख्या चित्रपटांचा समावेश होता. यापैकी 3 चित्रपट पूजा भट्टसोबत, 2 शिल्पा शेट्टीसोबत, 2 करिश्मा कपूरसोबत, एक श्रीदेवीसोबत आणि दोन रवीना टंडनसोबत होते. पण यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. राहुलने अभिनयासोबतच दिग्दर्शनातही नशीब आजमावले. त्यांनी अनेक भोजपुरी चित्रपट दिग्दर्शित केले, पण तिथेही त्यांना यश मिळाले नाही. आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत या अभिनेत्याने 2006 मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये प्रवेश केला. या शोमध्ये राहुलला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि तो शोचा विजेता ठरला, पण चित्रपटात पुनरागमन करू शकला नाही. त्यामुळेच त्याने बॉलिवूडपासून दूर राहून राजकारणात आपले नशीब आजमावले. राहुल रॉय याने 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

1971: “अपोलो 14 मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.

1979: चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांची पुण्यतिथी.

1929: महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्मदिन.

1958: चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्मदिन.

2012: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांची पुण्यतिथी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *