Padma Awards 2024 : 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Padma Awards 2024 : 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. पाच जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, आणि ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तर मिथुन चक्रवर्ती, संगीतकार प्यारेलाल आणि राजकारण क्षेत्रातून राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आलाय. मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत. ५० देशातील ५ हजारहून अधिक लोकांना त्यांनी मल्लाखांबाचं प्रशिक्षण दिलंय.