Bakri Eid 2020 | वारी, गणेशोत्सवाप्रमाणे ईदही साधेपणाने साजरी करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यात आपण सर्व धर्मिय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींसह मुस्लिम बांधवांना केले आहे. नुकत्याच झालेल्या वारीचे आणि येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी सण साजरे करतांना लवकरच नियमावाली जरी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे बकरी ईदला कुर्बानी देण्याससाठी मोठ्या कत्तलखान्यात गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन मटण दुकानांचा पर्याय सुचवला आहे. तसेच यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.