Beed Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण आंदोलकांनी घेतली पोलिसांची काळजी; बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा केला पाहुणचार

गेवराई, बीड :  दोन दिवसांपूर्वी जालन्यात मराठा आरक्षणासाठी  (Maratha Reservation Protest) सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिस आणि आंदोलन एकमेकांना भिडले होते. त्यामुळे आंदोलकांमध्ये पोलिसांबद्दलचा रोष वाढला होता. या लाठीचार्जचे पडसाद राज्यात उमटले. राज्यातील विविध ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात वेगळंच चित्र दिसले. 

जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांविरोधात झालेल्या लाठीचार्जविरोधात गेवराईच्या गुळज येथे मराठा बांधवांनी आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे आंदोलन झाल्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांचा चांगला पाहुणचार केला. या पोलिसांची त्यांना ड्युटी संपल्यानंतर जेवणाची देखील व्यवस्था आंदोलकांकडून करण्यात आली होती.

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि त्यांचं आमरण उपोषण सुरू असताना दोन दिवसापूर्वी पोलिसांनी आंदोलकांमध्ये मोठी हिंसा झाली. तर आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला यामध्ये पोलिसांवर देखील दगडफेक झाली आणि या घटनेत पोलिसासह आंदोलन देखील जखमी झाले आहेत.. या लाठी चारच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसाबद्दल मराठा समाज आक्रमक झाला आणि रस्त्यावर उतरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली.

तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेवराई तालुक्यातल्या गुळज येथे देखील मराठा बांधवांनी गोदावरी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं यावेळी गुळज गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि याच आंदोलना दरम्यान परिस्थिती कशी हाताळायची याची चुणूक गेवराई पोलिसांनी दाखवली असून पोलिसांनी आंदोलन यांच्यामध्ये चांगलाच समन्वय पाहायला मिळाला तर आंदोलन संपल्यानंतर मराठा बांधवांकडून पोलिसांच्या जीवनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. 

जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान, जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जालनामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. आतापर्यंत जालना जिल्ह्यात 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम 353, 332, 336, 337, 341, 435, 144, 143, 145, 146, 147, 148, 149, 109, 114 भादंविसह कलम 135 मु. पो. कायदा, सहकलम -3 व 4 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इतर संबंधित बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *