Breaking: शरद पवार यांच्यावरील दुसरी शस्त्रक्रियाही यशस्वी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रविवारी (ता.११) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. १२) त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही त्यांनी कळवले आहे. 

मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेआधी त्यांना सात दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. रविवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

– Corona Updates: कोरोनाचं ‘रौद्ररुप’; २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण​

दरम्यान, अनेक वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर एंडोस्कोपीदेखील करण्यात आली होती, पण गॉल ब्लॅडरमध्येही खडे असल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानुसार पवार यांच्यावर आज दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हापासून पवार मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राहत होते. 

– राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Leave a Reply

Your email address will not be published.