Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या चुकीच्या गोष्टीवर बोलतात म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना वाईट वागणूक : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस ज्या ठिकाणी चुकतंय त्यावर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) बोलत आहेत, त्यामुळं त्यांना वाईट वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. आता विधानसभेत त्यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या विरोधात बोलले म्हणजे ते भाजपाच्या संपर्कात आहेत, असं होत नाही असेही बावनकुळे म्हणाले. दरम्यान, भाजपाची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत. जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा. कारण तो त्यांचा विषय आहे. विस्तार कधी करायचा आणि कोणाला कोणती खाती द्यायची हे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांचा अधिकार असल्याचे बावनकुळे म्हणाले. एकदा आरोप झाला आणि त्यानंतर कोर्टात शिक्षा झाली तर आम्ही त्यांना घेत नाही असेही ते म्हणाले.

अजून कोणतीही यादी राज्यपालांकडे दिली नाही

अजून कोणतीही यादी राज्यपालांकडे दिलेली नाही. या मीडियाने तयार केलेल्या बातम्या असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात ढगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांचे आव्हान आहे का? असा सवाल देखील त्यांना प्रसारमाध्यमांनी विचाराला, यावेळी ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात कोणाचेही आवाहन नाही.

ठाकरे गटातील कार्यकर्ते राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडवतायेत

दादरमध्ये घडलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटातील कार्यकर्ते राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडवत आहेत. पोलीस त्याचा तपास करत आहेत. उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या लोकांना समजवून सांगावं. रस्त्यावरचा वाद टाळावा ही माझी विनंती असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

पंकजा मुंडे नाराज नाहीत

पंकजा मुंडे यांच्याशी मी  रोज बोलत आहे. त्या सध्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्या भाजप पक्षात नाराज नाहीत. त्या इमानदारीत काम करत असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावरही टीका केली. नाना पटोलेंना दिवसा स्वप्न पडत आहेत. त्यांची परिस्थिती काँग्रेसमध्ये केविलवाणी आहे. ते नितीन गडकरी साहेबांना काय ऑफर देणार.  मी जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही हे स्वतः गडकरी साहेब बोलले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

बारामतीची घडी बंद करणार

बारामतीची घडी बंद करणार असं मो बोललो होतो.  त्यामध्ये गैर काहीच नाही. मी बारामतीत काम करतोय. मी तीन महिन्यातून एकदा जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यादेखील सहा वेळा बारामतीमध्ये येणार आहेत. बारामती शहर म्हणजे लोकसभा मतदारसंघ नाही. शहराचा विकास केला म्हणजे काही उपकर केले नसल्याचे म्हणत बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Politics : भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या, चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थावर

Leave a Reply

Your email address will not be published.