Corona Update: दिलासा नाहीच; राज्यात रुग्णवाढ कायम

मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विषाणूवर मात करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले.  शिवाय नाईट कर्फ्यूही लागू आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वप्रकारची खरबदारी घेतली जात आहे. पण, तरीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत  58 हजार 993 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत,  तर 45 हजार 391 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यात 301 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची एकूण संख्या 57 हजार 329 झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 32 लाख 88 हजार 540  कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 26 लाख 95 हजार 148 लोकांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: maharashtra state Corona Update patients health ministry rajesh tope

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.