Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ; मृतांचा आकडाही वाढला

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत होती. मंगळवारी राज्यात जवळपास २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. पण, आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासांत राज्यात 39,544  कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 23,600 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यांत 227 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  राज्यात आतापर्यंत 28,12,980 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 24,00,727 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 54,649 झाला आहे. महाराष्ट्रात सध्या  3,56,243 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात ६० ते ७० टक्के रुग्ण आहे. राज्याच्या दृष्टीने ही चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लादण्यात आलं आहे. संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाऊन करायचा नसेल, तर लोकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. 
 

Leave a Reply

Your email address will not be published.