Corona Updates | महाराष्ट्रात आतापर्यंत 44 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त; आज 1879 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3254 ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या 94,041 इतकी झाली आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 149 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1879 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज 1879 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 44 हजार 517 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 3254 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94 हजार 041 इतका झाला आहे. पैकी सध्या 46 हजार 074 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज झालेल्या 149 मृत्यूपैकी 66 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 18 एप्रिल ते 6 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 83 मृत्यूपैकी मुंबई 58, ठाणे 9, नवी मुंबई 5, जळगाव 4, उल्हासनगर 3, वसई विरार 2 तर अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याती प्रत्येकी एकाच मृत्यू झाला.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 93 हजार 784 नमुन्यांपैकी 94,041 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 69 हजार 145 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 27 हजार 228 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 94,041
मृत्यू – 3438
मुंबई – 52667 (मृत्यू 1857)
ठाणे – 14720 (मृत्यू 378)
पालघर- 1738 (मृत्यू 45)
रायगड- 1575 (मृत्यू 58)
नाशिक – 1704 (मृत्यू 95)
अहमदनगर- 220 (मृत्यू 9)
धुळे – 334 (मृत्यू 25)
जळगाव- 1288 (मृत्यू 120)
नंदुरबार – 44(मृत्यू 4)
पुणे- 10406 (मृत्यू 439)
सातारा- 681 (मृत्यू 27)
सोलापूर- 1483 (मृत्यू 112)
कोल्हापूर- 671 (मृत्यू 8)
सांगली- 188 (मृत्यू 4)
सिंधुदुर्ग- 130
रत्नागिरी- 381 (मृत्यू 14)
औरंगाबाद – 2173 (मृत्यू 117)
जालना- 225 (मृत्यू 5)
हिंगोली- 214
Lockdown Again? गर्दी वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा