Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी सापडले 11 हजार रुग्ण

मुंबई : गेल्या काही दिवसात देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येतंय. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळालं असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून रविवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 11,141 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 97,983 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच 11 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान शहरातील सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली आहे. या दरम्यान लग्न समारंभावरही बंदी आणण्यात आली आहे. औरंगाबादल शहरात 4264 इतक्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येचा दर हा 93.17 इतका आहे तर मृत्यू दर हा 2.36 इतका आहे.

coronavirus | कोरोनाची सुरुवात कशी झाली? वुहानमधील एक महिन्याच्या तपासानंतर WHO जाहीर करणार अहवाल

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या ही 22,19,727 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52,478 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 1,361 रुग्ण सापडले असून शहरातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 3,35,569 इतकी झाली आहे.

कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने स्पष्ट केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खूप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी हा कोरोना पाहणी दौरा केला.

Corona Alert | कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता गेल्या वर्षाच्या ‘जुलै’ची आठवण

Leave a Reply

Your email address will not be published.