Crime: पती-पत्नीतील खासगी क्षणांचा व्हिडीओ चोरुन शूट केला, शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरातील धक्कादायक घटना

Solapur Crime News: सोलापुरात (Solapur City News) एक धक्कादायक घटना घडलीय. पती-पत्नीतील खासगी क्षणाचे व्हिडीओ (Video Shoot) शूट केल्या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या (Solapur Faujdar chavadi police station) हद्दीत बुधवारी ही घटना घडली. या संदर्भात पीडित महिलेने फिर्याद दिली असून शेजारी राहणारा आरोपी सुरेश कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घराच्या शेजारी राहणाऱ्यानंच काढला व्हिडीओ, गुन्हा दाखल

या घटनेतील पीडित पती – पत्नी हे 15 तारखेला मध्यरात्री त्यांच्या घरी शरीरसंबंध प्रस्थापित करत होते. त्यावेळी घराच्या छतावरील पत्र्याकडे पतीचे लक्ष गेले. तेव्हा कोणीतरी पत्र्याच्या फटीतून मोबाईलद्वारे व्हिडीओ शूटिंग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचवेळी सावध झालेल्या आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी पीडित व्यक्तीने देखील त्या आरोपीचा पाठलाग ही केला. मात्र आरोपी त्यांच्या हाती लागला नाही. मात्र पळून जाताना सदर आरोपी हा आपल्या घराशेजारी राहणारा सुरेश कांबळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पीडित पती पत्नी थेट फौजदार चावडी पोलिस ठाण्यात

घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर पीडित पती पत्नी काल (गुरुवारी) सकाळी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले. त्यानंतर आरोपी शेजारी सुरेश कांबळे याच्याविरोधात भांदवि कलम 354, 354 C अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी व्यक्ती हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

reels

ही बातमी देखील वाचा

Maharashtra Police: महिना उलटला तरी 163 पोलिस निरीक्षकांना पदोन्नती नाही, आता हिवाळी अधिवेशनाचं कारण सांगत पदोन्नती रखडवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *