Devendra Fadnavis | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस

नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.