Dhairyashil Mane : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला महाराष्ट्रवासियांना परवानगी नाही

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नागरिकांवर बंदी घालण्यात आलीय.. तर कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील मानेंनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आलीय.. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज हा आदेश काढलाय.. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील महामेळाव्याचे आयोजन केलंय..