Diva Dumping Ground : दिवा डंपिंग ग्राउंडचा वाद पुन्हा पेटला? ग्राउंडवरून भाजप आणि शिंदे गटात फूट?

भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंडसाठी तीन लाख ६५ हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यातलं डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आलेलं नाही. त्यामुळं या मुद्यावरून आता राजकारण पेटलंय. दिवा डंपिंग ग्राऊंडच्या विरोधात भाजपनं काल आंदोलन करून दहा दिवसात डंपिंग बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण डंपिंग बंद न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्याचवेळी भाजपकडून ही केवळ एक स्टंटबाजी होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. त्यामुळं राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार असतांनाही स्थानिक पातळीवर त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये डंपिंगच्या मुद्यावरुन संघर्ष होताना दिसून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *