E Pass | लॉकडाऊन काळात कोणत्या प्रवासासाठी लागणार ई पास?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ब्रेक दि चेनअंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्द, नोंदणी करण्याची आवश्यकता असणार आहे.