Ganesh Chaturthi 2020 | Pandharpur Vitthal Mandir | पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरले अष्टविनायक

गणराजचे आगमन होत असताना बाप्पाचे अनोखे स्वागत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने देवाच्या गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरले आहेत. गणेश चतुर्थी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल गाभारा, चौखांबी, सोळखांबी व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वांची आकर्षक पद्धतीने आरास केली आहे. यामध्ये अष्टविनायक प्रतिमा बसवल्याने विठ्ठल गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरल्याचा सुंदर आभास तयार झाला आहे. तर रुक्मिणी मातेला हिरव्या रंगाचा पैठणीमुळे दुर्वाच्या नैसर्गिक रंगात विठ्ठल रुक्मिणीचं रूप अजूनच खुलून दिसत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.