Girl Fight Video : एक फुल, दो माली; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Yavatmal Girl Fight Viral Video : एका तरुणासाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा (Girl Fight Video) झाल्याची घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली आहे. यवतमाळच्या वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट बनल्यांचं चित्र सध्या दिसत आहे. शिवाजी पार्कात का बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिनेमामध्ये दाखवतात, त्याप्रमाणे ‘एक फुल, दो माली’ अशा ही घटना आहे. 

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी

यवतमाळच्या वणीमध्ये नगरपालिकेच्या शिवाजी पार्कमध्ये एका तरुणासाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. दोन तरुणींसोबत एका तरुणाचं लपूनछपून रिलेशनशिप सुरू होतं. मात्र आज अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरून दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

तरुणींची एकमेकींना लाथाबुक्यांनी मारहाण

व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस उपटून आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली आहे. तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ केली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

राडा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींमधील राडा पाहायला मिळत आहे. या चारही कॉलेजमधील असल्याचं पाहायला मिळत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस ओढून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका तरुणामुळे या तरुणींमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं जात आहे. ही हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर सध्या हाणामारीचे व्हिडीओ जास्त व्हायरल होतात. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी लोक डब्यातील महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. या लोकलमधील महिलांनी एकमेकींना केस ओढून मारहाण केली होती. आता या तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी फ्री-स्टाईल हाणामारी करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Video : भररस्त्यातच फ्री स्टाईल राडा; लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *