Janashirwad Yatra पिंजऱ्यात राहून कुणी सत्ता चालवली नाही,काहीजण सत्तेची मस्ती दाखवतायत: Narayan Rane

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर थांबलेली जनआशीर्वाद यात्रा आज कोकणात पुन्हा सुरू झाली. राणे रत्नागिरीतून यात्रेला सुरुवात करून नंतर संध्याकाळनंतर त्यांच्या होमपीचवर म्हणजे सिंधुदुर्गात जाणार आहेत. सिंधुदुर्गात जमावबंदी लागू करण्यात आल्यानं राणेंच्या यात्रेत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच राणेंनी शिवसेनेवर टीका सुरूच ठेवली तर जनआशीर्वाद यात्रेला विरोध करू असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिल्यानं कोकणात राणे आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.