JEE Main 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला जाण्याअगोदर वाचा महत्त्वाच्या सूचना

पुणे : अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी जेईई मेन्स परीक्षा मंगळवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. ही परीक्षा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

एलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुण्याचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘मंगळवारी पहिल्या दिवशी आर्किटेक्ट, प्लानिंगची परीक्षा होणार आहे. त्यात एकूण ८२ प्रश्‍न विचारले जाणार असून, त्यातील ७७ प्रश्‍न सोडवायचे आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेतील तिसरा भाग असलेल्या ड्रॉइंग टेस्टसाठी भूमितीय मोजमाप साहित्य, पेन्सील घेऊन जाता येईल. त्यावर वॉटर कलर वापरता येणार नाही.’’

– पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला​

‘‘२४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. यंदाचा परीक्षेचा पॅटर्न बदललेला असून, विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्‍न सोडवायचे आहेत, तसेच शहरात परीक्षा केंद्रांची संख्या दोन वरून सहा करण्यात आली आहे,’’ असे आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.

– पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा​

याकडे लक्ष द्या
– परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास केंद्रावर उपस्थित राहावे.
– कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटाझर सोबत नेता येईल.
– पारदर्शक पाण्याची बॉटल सोबत आता नेता येईल.
– कोणत्याही स्वरूपाची इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्रात नेता येणार नाही.
– विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मास्क उपलब्ध करून दिला जाईल.
– रफ कामासाठी परीक्षा केंद्रावर ६ शीट दिल्या जातील, त्या परीक्षा संपल्यावर परत कराव्या लागतील.

– राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Leave a Reply

Your email address will not be published.