Jitendra Awhad Resigned From NCP: जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा; पवारसाहेबांनी निर्णय मागे घ्यावा, आव्हाडांची मागणी

Jitendra Awhad Resigned From NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडांसोबतच ठाण्यातील राष्ट्रीवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. यासोबतच शरद पवार (Sharad Pawar) यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एवढंच नाहीतर शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सर्वांनी आपले राजीनामे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे पाठवले आहेत. जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, “शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नवीन कोणी अध्यक्ष झाला असेल तर त्या संदर्भात मला माहिती नाही. एकदा शरद पवार पदावरून बाजूला झाले की, मग ते लक्ष देणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आहे.” 

मंगळवारी (2 मे) अजित पवार यांनी पक्षातील कोणाचाही राजीनामा स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं, असं असतानाही जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल देसाई यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात होतं. मात्र जयंत पाटील यांनी स्वतः एबीपी माझाशी बोलताना राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं. तसेच, अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे त्यांच्याकडे येत असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

पाहा व्हिडीओ : Jitendra Awhad : शेवटपर्यंत Sharad Pawar हेच अध्यक्ष राहावे यासाठी मी प्रयत्न करणार- आव्हाड

[embedded content]

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि राष्ट्रवादी पक्षासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. अशातच आज पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईतील व्हाय. बी. सेंटरमध्ये पार पडत आहे. मात्र या बैठकीबाबत राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड अनिभिज्ञ असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाची महत्त्वाची बैठक आणि त्याबाबत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *