Kirtankar Tajuddin Maharaj यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अनुयायींच्या प्रतिक्रिया ABP Majha

धुळे/औरंगाबाद : विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने आपले संपूर्ण आयुष्य जगणारे वारकरी संप्रदायातील मात्र धर्माने मुस्लिम असलेले ताजुद्दीन शेख औरंगाबाद यांचे काल (सोमवारी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जामदा येथे किर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी जालना जिल्ह्याच्या घनसांगवी तालुक्यातील बोधलापुरी गावातील त्यांच्या आश्रमात साई मंदिराच्या समोर त्यांचा दफनविधी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.