Kisan Long March : अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, किसान मोर्चाचा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकडे निघालेलं लाल वादळ घोंगावणार की परतणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.. शेतकरी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली ज्यामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात.. शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून लाँग मार्च आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी कालच्या बैठकीत केलं.. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री सभागृहात निवेदनही देणार आहेत..मात्र जोवर अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन सुरु ठेवणार असा इशारा किसान मोर्चानं दिलाय.. नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आता वाशिंदमध्ये पोहचलाय… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *