Lockdown 4.0 | रेड झोन असलेल्या मुंबईच्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम; मुंबईकरांकडून लॉकडाऊनची ऐशीतैशी

Updated : 19 May 2020 01:48 PM (IST)

जवळास 21 हजार कोरोनाचे रुग्ण असलेल्या मुंबईच्या  रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पश्चिम द्रुतगती मार्गावर सकाळपासून असलेलं ट्रॅफिक जाम दुपारी एकच्या ठोक्यालाही कायम आहे..  त्यामुळं लॉकडाऊनची ऐशीतैशी करुन मुंबईकर निघाले कुठे असा प्रश्न तुम्हाला देखील ही दृश्य पाहिल्यानंतर पडला असेल. दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावर आता पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरु झालीय. असं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आलेल्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे का? त्यांनी ई-पास काढला आहे का असे प्रश्न आता उपस्थित होताहेत.. 

Leave a Reply

Your email address will not be published.