Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा आणखी सैल, राज्यात आज  1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 21  हजार 756  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के आहे. 
 
राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7843  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (0),  धुळे (3), जालना (69), परभणी (28), हिंगोली (22), नांदेड (18),  अकोला (25), अमरावती (10),  वाशिम (07), अकोला (22), बुलढाणा (16), नागपूर (61), यवतमाळ (08),  वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (3),   गडचिरोली (5 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात सध्या 28 हजार 008 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,08,613व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 961  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2, 08, 613 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 373 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 373 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 543 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,27,627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5183 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1253दिवसांवर गेला आहे.

 देशात 8 महिन्यांनी 14 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद

 देशात 8 महिन्यांनी 14 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 13,596 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 166 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात 19,582 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या 230 दिवसांनी सर्वात कमी झाली आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 81 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 39 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. एकूण 1 लाख 89 हजार 694 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published.