Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 319 रुग्ण सापडले,  XBB व्हेरियंटच्या 36 रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Update) झाली असून 406 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. 

राज्यात आतापर्यंत एकूण 79,81,541 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 81,31,458 इतकी झाली आहे. 

एक्सबीबी व्हेरियंटचे 36 रुग्ण 

कोरोनाच्या एक्सबीबी व्हेरियंटच्या (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 21 तर त्या खालोखाल ठाण्यात 10 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर नागपूरमध्ये 2 तर अकोला, अमरावती, रायगडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 22 पुरुष तर 14 स्त्रिया आहेत. या 36 रुग्णांपैकी दोन रुग्ण वगळता इतर सर्व रुग्णांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. 

राज्यात आज एकूण 1532 सक्रिय रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 531 रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. त्यानंतर पुण्यात 307 रुग्ण सापडले आहेत. 

देशातील स्थिती 

देशात गेल्या 24 तासांत 1574 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल. सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 0.95 टक्के आहे. शुक्रवारी 2 हजार 208 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते आणि 12 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजे एका दिवसात 634 रुग्णांची घट झाली आहे. देशात सध्या 18 हजार 802 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी ही संख्या 20 हजार 821 इतकी होती. देशात नव्याने 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब अशी आहे की, देशात दोन हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार161  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *