Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू; तर 6,269 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 6,269  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 332 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 29 हजार 817 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35टक्के आहे. 

राज्यात आज 224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  93 हजार 479रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (56), यवतमाळ (9), गोंदिया (58), गडचिरोली (81) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

परभणी  महानगरपालिका क्षेत्रात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 869 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 66,44, 448 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,58, 079 (13.42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,27,754 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,621व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 413 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 413 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 611रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,09,809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,779 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1241 दिवसांवर गेला आहे. 

देशात 24 तासात 39,097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या 24 तासांत 39,097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 546 कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. यापूर्वी शुक्रवारी 35,342 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 35,087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. एकूण 4 लाख 8 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.